Thursday, March 13, 2014

७ नंबर

http://www.nytimes.com/2014/05/30/nyregion/trouble-with-diagonal-elevator-held-up-no-7-subway-expansion.html?module=Search&mabReward=relbias%3Ar%2C%5B%22RI%3A9%22%2C%22RI%3A15%22%5D&_r=0


. 42ND ST.

An Elevator With an Inclination

The diagonal elevators that are to take riders the last 81 feet down to the new No. 7 train station below 34th Street have been expensive and time consuming to build.
To
street
CAPACITY
15 standing or
5 wheelchairs
SPEED
100 feet per minute
TRAVEL TIME
Two minutes
Track, 172 feet long, not to scale
Electric motor and pulleys
DOORS
On 



७ नंबरचा आणि माझा संबंध फार जुना आहे. अमेरीकेला पहिल्यांदा आले तेंव्हा पासूनचा. आल्या आल्या क्विन्स मधलं सनिसाईड मुंबई सारखच वाटलं होतं मला- मध्यम उंचीच्या जुन्या इमारती, बिल्डींगमध्ये आणि रस्त्यात दिसणारी अनेक रंगांची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं - त्यात बरेच भारतीय सुद्धा. सुपरमार्केट, बाजारहाट सगळ चालत जायच्या अंतरावर- कोणाच्या मोटारीवर अवलंबून राहायला नको कि आल्याआल्या लगेच ड्रायव्हिंग लायसन्स काढायची घाई नको. रुळायला काहीच त्रास पडला नाही. सानिसाईड मधून बाहेर पडून दुसरीकडे कुठेही जायला ७ नंबर होतीच. अजूनही आहे. आता तिच्यातली गर्दी थोडी वाढलीय एवढच.

तशी फ्लशिंग मधली गर्दीही आता खूप वाढलीय. अख्ख चायना टाऊन डाऊन टाऊन मँनहट्टनमधून फ्लशिंगला स्थलांतरित झालय असं वाटतं. पण तसं काही नसावं कारण मँनहट्टनच्या चायना टाऊनची गर्दी आधी होती तितकीच आहे किंबहुना ती हि जास्त वाढलीय. पंधरा- वीस वर्षांपूर्वी फ्लशिंगमध्ये बऱ्यापैकी भारतीय दिसायचे. हिंदी - चीनी भाई भाई बरोबरच्या संख्येने असावेत असं वाटायचं. आता मात्र जास्त चायनीज आणि कोरीअनचं दिसतात. देशी त्यामानानं कमी; बहुतेक सगळे उपनगरात रहायला गेले असावेत. फ्लशिंगच मेन स्ट्रीट पूर्ण चीनमय झालय. सगळे बोर्ड, दुकानाच्या पाट्या चीनी भाषेतून. बँकेच्या ए टी एम मध्ये पैसे काढायला गेलं तर आधी स्क्रीन वर चायनीज येतं मग इंग्लिश. एखाद्या अमेरिकन केश -वेशभूषा असलेल्या चीनी बाईला गाठून पत्ता विचारला तर तिला इंग्रजीचा ओ कि ठो कळत नाही मग दुकानदारांची गोष्टच सोडा. चिन्यांच्या दुकानात मासे छान, ताजे मिळतात म्हणून घ्यायला जावं तर सगळा खुणांचा कारभार; फारच फ्रस्ट्रेटिंग अनुभव!

मँनहटनमधून फ्लशिंगला जायला लोकल ट्रेन फक्त ७ नंबर. तशा लॉंग आयलंडला जाणाऱ्या ट्रेन्स थांबतात पण त्या एक्स्प्रेस. सगळीकडे थांबत जाणारी फक्त ७. क्विन्स मधला तिचा मार्ग सनिसाईड, वूडसाईड, जाक्सन हाईट्स मधल्या  उंचावलेल्या रुळांवरून जातो. त्या भागात रहाणारे बहुतेक लोक दुसऱ्या कुठल्यातरी देशातुन अमेरिकेत अवतरलेले. बांधकाम, रेस्तोरांतस अशाप्रकाच्या लहान - मोठ्या नोकऱ्यांसाठी दररोज मँनहट्नला जाणारे. चीनी, मेक्सिकन, दक्षिण अमेरिकन, बांगलादेशी, नेपाळी, पूर्व युरोपियन असं सगळं मिश्रण असतं त्या गाडीत. अमेरिकन लोकं मला वाटतं तिच्यात दोनच कारणांसाठी चढतात - सिटी फिल्ड स्टेडियमवर बेस बॉलचा गेम असेल तर नाहीतर दरवर्षी सप्टेंबर मध्ये यू एस ओपन नावाची जत्रा भरते तेंव्हा. सिटी फिल्ड आणि आर्थर एश टेनिस स्टेडियम दोन्हीसाठी स्टेशन एकच - फ्लशिंगच्या आधीचं मेट्स- विलेटस पॉईंट.

जिथे शक्य असेल तिथे एकटीनं वाहन हाकत जाण्यापेक्षा बस- ट्रेन पकडण्यावर माझी श्रद्धा जास्त. प्रवास एकलकोंडा होत नाही. बरोबरच्या प्रवाशांचा मनोरंजनासाठी उपयोग होतो. वेळ पटकन जातो. उतरायचं ठिकाण कधी आलं ते समजतही नाही. रोज अप - डाऊन करणाऱ्या लोकांना त्याच काही विशेष वाटत नसेल; ते एकतर कानात यंत्र घालून काहीतरी ऐकत तरी बसतात नाहीतर झोप तरी काढतात. गाडीत कोण शिरतय, कोण उतरतय त्यांना काहीच सोयरसुतक नसतं. पण अडीच डॉलरच्या तिकिटात मिळणारं हे ब्रॉडवे शो च्या तोडीचं नाट्य मी भरपूर एन्जॉय  करते: मध्येच एखादं मेक्सिकन जोडपं डब्यात चढतं. हातातलं छोटं वाद्य वाजवत पट्कन आपल्या भाषेत सुरेल गायला सुरवात करतं. तो गात रहातो तोवर ती डब्यात फिरून काय डॉलर दोन डॉलर मिळतील ते घेते, लगेच पुढच्या स्टेशनला दोघे उतरतात आणि शेजारच्या डब्यात शिरतात. कोणतरी फोनवर कोणाच्या तरी गंभीर आजाराची जोरजोरात चर्चा करत असतं. हत्ती सारखा सुजलेला, काळानिळा, जखमांनी भरलेला पाय घेऊन उद्या ऑपरेशन आहे, पाय कापून टाकायचाय, आजच्या जेवणाला पैसे द्या म्हणत कोणीतरी भिक मागून जातो. कधी नातवंड आज्जीला बेस बॉल बघायला नेत असतात. आयुष्यभर ब्रूकलिन मध्ये राहून आणि स्टेटन आयलंड मध्ये नोकरी करूनही आज्जीनं क्विन्स मध्ये पाऊल ठेवलेलं नसतं. ७ नंबर क्विन्समध्ये शिरल्यावर बोगद्याच्या बाहेर येते तशी आज्जीबाई खिडकीच्या बाहेर बघून - अय्या, हा ब्रिज कुठला ( क्विन्स बरो), क्विन्स मध्ये एवढ्या बिल्डींग, एवढं मोठं पार्क आहे मला माहितच नव्हतं असले विस्मयचकित उद्गार काढत सहप्रवाशांशी संवाद साधत रहाते; अंधाऱ्या बोगद्यातून भरधाव निघालेली गाडी एकदम गचके देत थांबते. बंद पडली कि काय वाटावं असे कर्कश्श मोठ्ठे आवाज करत धक्के देत थोडी पुढे सरकते. काही प्रॉब्लेम झाला तर आपण सध्या क्विन्स आणि मँनहट्टनच्यामध्ये नदीखाली आहोत हा विचार डोक्यात येऊन काळजी वाटायला लागते. सभोवताली नजर टाकावी तर रोजचे प्रवासी ह्यात काहीच विशेष नाही अशा निर्विकार चेहऱ्यानं शांत बसलेले असतात…

अमेरिकेतल्या लहान गावांची मला फार भीती वाटते. जिकडे तिकडे शुकशुकाट, एकसारखी एक दिसणारी बैठी घरं, निर्मनुष्य रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारी छातीत धडकी भरवतात. सुरवातीला काही दिवस सनिसाईडमध्ये राहिल्यावर- बरोबरच्या देशी कंपनीच्या प्रभावामुळे- आम्हीही प्रयत्न केला न्यू जर्सीतल्या एका उपनगरात जाऊन रहायचा. प्रत्येक वेळी न्यूयॉर्कला आलं कि बसच्या रांगेत उभी असलेली मंडळी आणि लगबगीन ट्रेन स्टेशनकडे निघालेले लोक बघितले कि त्यांचा हेवा वाटायचा. एखाद्या खूप नॉर्मल गोष्टीला आपण मुकतोय असं वाटायचं. तरीही तेंव्हा ७ नंबरशी सबंध सुटला तो सुटलाच. मँनहट्टनला रहायला आलो तरी तो पुन्हा जोडायला मध्ये खूप वर्ष गेली. आता मात्र आवर्जून मी तिच्याशी पुन्हा संबंध जोडलाय. फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जायच्या निमित्तानं किंवा मुलाबरोबर टेनिस सेंटरला जाताना तिच्यात बसलं, वाटेत ४० स्ट्रीट, ४६ स्ट्रीट हि माझी जुनी सनिसाईडची स्टेशन्स लागली, मध्ये ७४ स्ट्रीट- जाक्सन हाईट्सच्या इंडियन मार्केटला उतरलं कि घरी आल्या सारखं वाटतं. दुधाची तहान तात्पुरती ताकावर भागते.

वीस वर्षात आजूबाजूल बरीच स्थित्यंतर घडतात. जुनी सवयीची मासिकं/ टी व्ही शो बंद होतात नाहीतर त्यांचं रूप तरी पालटत. नवीन वसाहती वसतात त्यांच्यासाठी बस/ ट्रेनचे मार्ग बदलले जातात. ७ नंबरही त्याला अपवाद नाही. इतकी वर्ष ती टाईम्स स्क्वेअरहून सुटायची आता आणखी थोडं पश्चिमेला जेकब जाव्हीटस सेंटरपर्यंत तिला आणायचं काम चालू आहे. उन्हाळ्यात ते बहुतेक पूर्ण होईल. त्यानंतर आमचा सुरवातीचा स्टोप टाईम्स स्क्वेअर असेल कि दुसरा कुठला तरी ते ठरेल.


7 लाइन मार्ग नकाशाप्रतिमा सेवा सल्ले

स्टेशन सेवासबवे बदली
सर्व टाइम्स प्रतीक थांबेपूर्ण वेळ
रेल्वे नेहमी संचालन
आणि नेहमी येथे थांबे
पूर्ण वेळ सबवे हस्तांतरण प्रतीकपूर्ण वेळ
व्हीलचेअर सुलभACCESSIBLE स्टेशनअर्धवेळ सबवे हस्तांतरण प्रतीकअर्धवेळ
विमान प्रतीकबस किंवा AIRTRAIN
विमानतळावर



केंद्र / क्रॉस गल्ल्यासबवे
हस्तांतरणासाठी
7 लाइन प्रतीकQueens
सर्व टाइम्स प्रतीक थांबेफ्लशिंग-मुख्य रस्ता /
रूझवेल्ट अव्हेन्यू
व्हीलचेअर सुलभ
विमान प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबेमेट्स-Willets पॉइंट
व्हीलचेअर सुलभ खेळ दिवस आणि विशेष घडामोडींवर प्रवेशक्षमता केवळ
7 एक्सप्रेस लाइन प्रतीक विमान प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबे111 स्ट्रीट /
रूझवेल्ट अव्हेन्यू
विमान प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबे103 स्ट्रीट-कोरोना प्लाझा /
रूझवेल्ट अव्हेन्यू
सर्व टाइम्स प्रतीक थांबेजंक्शन दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता /
रूझवेल्ट अव्हेन्यू
व्हीलचेअर सुलभ
7 एक्सप्रेस लाइन प्रतीक विमान प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबे90 स्ट्रीट-अल्म्हर्स्ट अव्हेन्यू /
रूझवेल्ट अव्हेन्यू
सर्व टाइम्स प्रतीक थांबे82 स्ट्रीट-जॅक्सन हाइट्स /
रूझवेल्ट अव्हेन्यू
विमान प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबे74 स्ट्रीट-ब्रॉडवे /
रूझवेल्ट एव
व्हीलचेअर सुलभ
ई लाइन पूर्ण वेळ प्रतीक परवेझ लाइन पूर्ण वेळ प्रतीक एम लाइन अर्धवेळ प्रतीक आर लाइन अर्धवेळ प्रतीक विमान प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबे69 स्ट्रीट /
रूझवेल्ट अव्हेन्यू
सर्व टाइम्स प्रतीक थांबेWoodside-61Street /
रूझवेल्ट अव्हेन्यू
व्हीलचेअर सुलभ
7 एक्सप्रेस लाइन प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबे52 स्ट्रीट /
रूझवेल्ट अव्हेन्यू
सर्व टाइम्स प्रतीक थांबे46 स्ट्रीट /
Queens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता
सर्व टाइम्स प्रतीक थांबे40 स्ट्रीट /
Queens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता
सर्व टाइम्स प्रतीक थांबे33 स्ट्रीट /
Queens दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता
सर्व टाइम्स प्रतीक थांबेQueensboro प्लाझा /Queensboro ब्रिजएन लाइन पूर्ण वेळ प्रतीक प्रश्न लाइन अर्धवेळ प्रतीक 7 एक्सप्रेस लाइन प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबेन्यायालयाने चौ.फू. व्हीलचेअर सुलभ केवळ 7 प्रतीकओळ अडा-प्रवेशजोगी आहेई लाइन पूर्ण वेळ प्रतीक जी लाइन पूर्ण वेळ प्रतीक एम लाइन अर्धवेळ प्रतीक 
सर्व टाइम्स प्रतीक थांबेHunters पॉइंट अव्हेन्यू /49 ऍव्हेन्यू / 21 स्ट्रीट
सर्व टाइम्स प्रतीक थांबेवी दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठा रस्ता-
जॅक्सन अव्हेन्यू
7 लाइन प्रतीकमॅनहॅटन
सर्व टाइम्स प्रतीक थांबेग्रँड सेंट्रल-42 स्ट्रीट /
लेक्सिंग्टोन अव्हेन्यू
व्हीलचेअर सुलभ
एस लाइन अर्धवेळ प्रतीक 4 लाइन पूर्ण वेळ प्रतीक 5 लाइन अर्धवेळ प्रतीक 6 लाइन प्रतीक
विमान प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबे5 ऍव्हेन्यू- ब्रायंट पार्क /
42 स्ट्रीट
ब लाइन अर्धवेळ प्रतीक डी लाइन पूर्ण वेळ प्रतीक परवेझ लाइन पूर्ण वेळ प्रतीक एम लाइन अर्धवेळ प्रतीक
सर्व टाइम्स प्रतीक थांबेटाइम्स स्क्वेअर-42 स्ट्रीट /ब्रॉडवे / 7 ऍव्हेन्यू
व्हीलचेअर सुलभ
ओळ पूर्ण वेळ प्रतीक सी लाइन प्रतीक ई लाइन पूर्ण वेळ प्रतीक एन लाइन पूर्ण वेळ प्रतीक प्रश्न लाइन पूर्ण वेळ प्रतीक आर लाइन अर्धवेळ प्रतीक एस लाइन अर्धवेळ प्रतीक 1 लाइन पूर्ण वेळ प्रतीक 2 लाइन पूर्ण वेळ प्रतीक 3 लाइन अर्धवेळ प्रतीक विमान प्रतीक
Marathi

No comments:

Post a Comment